आता म्हणे दाऊद पाकिस्तानात नाही ; पाकचा यु-टर्न

 

माय अहमदनगर वेब टीम

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) - ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (एफएटीएफ) द्वारे काळ्या यादीत घातले जाईल, या भीतीपोटी अखेर पाकिस्तानने दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये किनारपट्टीच्या ठिकाणी राहत असल्याचे कबूल केले होते. त्यानंतर २४ तासांच्या आतच पाकिस्तानने आपल्या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. दाऊद पाकिस्तानमध्ये नाही, असे इमरान खान सरकारने म्हटले आहे.

पाकिस्ताने ८८ दहशतवाद्यांवर बंदी घातली आहे. दहशतवाद्यांच्या यादीमध्ये दाऊचाही समावेश असल्याचे पाकिस्ताननं म्हटलं होतं. मात्र, या वक्तव्याने अडचणीत अल्याने पाकिस्तानने दाऊद कराचीच राहत नसल्याचं सांगत घूमजाव केले. दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्ये राहत नसून माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या निराधार आणि चुकीच्या आहेत. भारतीय माध्यमांद्वारे केलेले दावे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं पाक परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post