शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार : अॅड. विवेक नाईक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : संपूर्ण राज्यभर दूध दरवाढीसाठी भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नगर शहर भाजपाच्यावतीने बुथ हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला दूध वाटप केले. तसेच स्टेट बॅक चौकातील महादेव मंदिरात दूध अभिषेक करण्यात आले. तसेच शहरातील भिंगार, आनंद लॉन, रोटरी आदी कोविड सेंटरला दूध वाटप करण्यात आले. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरु असे प्रतिपादन अॅड. विवेक नाईक यांनी केले.
शहर जिल्हा भाजपाच्यावतीने दूध दरवाढीसाठी बुथ हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला दूध वाटप करण्यात आले. यावेळी हापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, संघटक सरचिटणीस अँड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धीप्रमुख अमित गटणे, शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, दत्ता गाडळकर, चेतन जग्गी, विलास गांधी, बंटी ढापसे, रोषण गांधी, अविनाश साखला, संपत नलवडे, शशिकांत पालवे, महादेव गाडे, पवन चुटके, मयूर बोचूघोळ, वसंत राठोड, पंकज जहागिरदार, शिवाजी दहिहंडे, शाहीर शेख, पुष्कर कुलकर्णी, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड. विवेक नाईक कोरोना संसर्गाच्या काळात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नाकडे या सरकारने अक्षरश: दुर्लक्ष केले आहे. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही दुर्लक्ष होत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी दूध दरवाढीसाठी आज आंदोलन केले आहे. दुधाला 30 रु. भाव मिळाला पाहिजे. दुधाच्या भुकटीला 50 रु. व दुधाला 10रु. अनुदान मिळावे. तसेच पावसाळ्यामध्ये शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचे पंचनामे त्वरित करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यापुढील काळात शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन हात घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

Post a Comment