नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर (Twitter) अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत.
आता त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल 60 मिलिअनच्या पुढे गेली आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतासह संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक लोक ट्विटरवर फॉलो करतात. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी -
सप्टेंबर 2019 पर्यंत पंतप्रधान मोदींना ट्विटरवर एकूण 5 कोटी लोक फॉलो करत होते. ते आता वाढून 6 कोटी झाले आहेत. याचा अर्थ केवळ 10 महिन्यांतच त्यांना तब्बल 1 कोटी लोकांनी ट्विटरवर फॉलो केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 2 कोटी 16 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1 कोटी पाच लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.
पहिल्या क्रमांकावर आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा -
ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिला क्रमांक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा लागतो. ओबामा यांचे ट्विटरवर तब्बल 120.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. याचाच अर्थ त्यांना तब्बल 12 कोटी लोक ट्विटरवर फॉलो करतात. यानंतर दुसरा क्रमांक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर तब्बल 83.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 37 लाख लोक फॉलो करतात.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा -
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर 52 लाख लोक फॉलो करतात. राहुल गांधींनी एप्रिल 2015 मध्ये ट्विटर अकाउंट सुरू केले आहे. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये ट्विटरवर अकाउंट सुरू केलेल्या काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांना 25 लाख (2.5 मिलियन) युझर्स फॉलो करतात. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक कोटी 99 लाख लोक फॉलो करतात.
Post a Comment