तपोवन रास्ताची चौकशी सुरू
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - तपोवन रस्ता अनेक वर्षापासून दुरावस्थेत होता. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून शिवसेनेने वारंवार आंदोलने करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होवून ३.५ कोटींचा निधीही मंजूर झाला. या मोठ्या निधीतून दर्जेदार व या भागाचे वैभव वाढवेल असा रस्ता होणे अपेक्षित आहे. मात्र या ठेकेदाराने कामात मोठा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट चालवली आहे. शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पुणे कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यास सुरु केली आहे. त्यामुळे या कामात झालेला भ्रष्टाचार लवकरच जनते समोर येईल. ज्यांचे ज्यांचे हात या कामांत भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांच्याच माथी हे पाप आम्ही टाकणार आहोत, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी दिला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेल्या तपोवन रस्ताच्या कामांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी करत कामची चौकशी व तपासणी करण्याची तक्रार सरकारकडे केली होती. त्यानुसार पुणे येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी आज सकाळी तपोवन रस्त्याची पूर्ण पाहणी करून दर्जाची, वापरलेल्या डांबराची, खडीकरण ची तपासणी उपनेते अनिल राठोड यांच्या समवेत केली. रस्त्याची झेलली दुरावस्ता दाखवतांना संतप्त झालेले राठोड यांनी यावेळी अधिकारींना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकक्ष अभियंता पेशवे, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, दिगंबर ढवण, गिरीश जाधव, उपशहर प्रमुख डॉ. चंद्रकांत बारस्कर, अशोक कातोरे, विक्रम राठोड, अनिकेत कराळे, आदींसह स्थानीक नागरिक उपस्थित होते.
यावेळी ठिकठिकाणी रस्ता खोदुन वापरण्यात आलेल्या मटेरियलची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला आहे, रस्त्याचे डांबर हाताने निघत आहे आदि बाबी अभिषेक कळमकर, आनंद लहामगे यांनी यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. दिगंबर ढवण यांनी ठिकठिकाणी रस्त्याची झालेली दुरवस्था दाखवली.
नागपूरहून आलेले वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांनी २० जुलैपर्यंत या कामची संपूर्ण तपासणी करणार आहोत व अहवाल पाठवणार आहोत, असे यावेळी सांगितले.
Post a Comment