राज्यात शुक्रवारी रेकॉर्डब्रेक नवे रुग्णमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात शुक्रवारी रेकॉर्डब्रेक ७,८६२ नवे रुग्ण, तर २२६ मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांचा एकूण आकडा २ लाख ३८,४६१ वर गेला आहे. एकूण बळींची संख्याही ९,८९३ वर गेली.

शुक्रवारी ५,३६६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा १ लाख ३२,६२५ वर गेला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्क्यांवर पोहोचले. आता ९५,६४६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


जालन्यात २, नांदेडमध्ये एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

आैरंगाबाद | कोरोनामुळे शुक्रवारी जालना जिल्ह्यात दाेन, तर नांदेड येथे एक रुग्ण दगावला आहे. जालना जिल्ह्यात ५६, नांदेड ३४, हिंगोली १२, तर परभणी जिल्ह्यात पाच रुग्णांची भर पडली आहे. औरंगाबाद : २७७ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात शुक्रवारी नवे २७७ रुग्ण, तर ३ रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झाली. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ७९४९ वर पोहोचली आहे. एकूण बळींची संख्या ३४० झाली. आजवर एकूण ४१६२ जण काेराेनामुक्त झाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post