पतसंस्थेची शाखा फोडून रोकड पळविली
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शटरची सेंटरची लॉकपट्टी तोडुन शटर उचकटुन अज्ञात चोराने आत प्रवेश करून आतील सामानाची उचकापाचक करीत गल्ल्यातील 4 हजार 527 रूपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि.29) सायंकाळी 5.30 ते मंगळवारी (दि.30) सकाळी 6.30 च्या दरम्यान नगर- पुणे रोडवरील कामरगाव येथील कै. राजीव गांधी नागरी सह. पतसंस्था येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, राजीव गांधी पतसंस्थेचे कार्यालय सोमवारी संध्याकाळी 5.30 ला नेहमीप्रमाणे बंद झाले. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी शेजारील नागरिकांचा फोन आल्याने पतसंस्थेचे पदाधिकारी धावत संस्थेत आले असता त्यांना चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी पतसंस्थेत जाऊन पाहणी केली असता आतील कागदपत्रे व साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसुन आले. तसेच काउंटरमध्ये असलेले 4 हजार 527 रूपये (त्यात 50, 20, 10 रूपयांच्या नोटा व काही चिल्लर) चोरांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेचीमाहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच नगर तालुका पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी शरद पवार याने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलिस नाईक प्रमिला गायकवाड या करीत आहेत.
Post a Comment