मंत्री नव्हे, अधिकारीच सरकार चालवतात


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - कोरोना संदर्भात राज्य सरकारने ज्या पद्धतीने उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या केल्या नाही. सर्व मंत्री सत्ता उपभोगण्यात मस्त झाले आहेत. सध्या मंत्री नाही, तर अधिकारीच सरकार चालवत आहे, असे चित्र असल्याचा आरोप भाजपच्या महामंत्री आमदार देवयानी फरांदे यांनी केला. कोरोना संदर्भात उपाययोजनांमध्ये सरकार अपयशी झाल्याचे सांगत अनुभवी असलेल्या शरद पवार यांनी हातात हंटर घेऊन सरकारकडून काम करून घ्यायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या.

नगर येथील शासकीय विश्रामगृहावर भाजप पदाधिकार्‍यांची बैठक आमदार फरांदे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आज निधी उपलब्ध नाही, असे राज्य सरकार सांगत आहे. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या बाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढली पाहिजे. राज्यात निधी उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सगळ्याच गोष्टी तुम्ही केंद्राकडे मागत असाल, तर राज्य सरकारचा उपयोग काय? वेळप्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत

विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्यांच्यावर कोरोना इंजिनीयर, पदवीधारक असा शिक्का बसेल. पुढे त्यांचे काय भविष्य असेल, असा सवाल आमदार फरांदे यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात शाळांकडून ऑनलाईन शिक्षण सुरू असतांनाही शाळा सर्रास फी आकारत आहेत. याकडे लक्ष द्यायला, सरकारला लक्ष नाही, असा आरोपही फरांदे यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post