शेततळ्यात बुडून चुलत बहीण-भावाचा मृत्यू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावाच्या पवारपट्टा पठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवारात चुलत बहीण-भावाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता घडली. चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र रघू पवार यांचा इयत्ता सातवी शाळेत शिकणारा तेरा वर्षांचा मुलगा तुषार राजेंद्र पवार, तसेच संदीप रघू पवार उर्फ पैलवान यांची इयत्ता चौथीमध्ये शिकणारी नऊ वर्षांची मुलगी संस्कृती, अशी मृतांची नावे आहेत. पवार पट्ट्यात पवार कुटुंबीयांचा गोठा आहे. तिघेजण गोठ्या शेजारीच असणार्‍या शेततळ्याजवळ खेळत होते. शुक्रवारी दुपारी अंदाजे 3.30 वाजता खेळता खेळता तुषार व संस्कृती शेततळ्यात पडली. त्यांच्या बरोबरच एक लहान मुलगी सुद्धा खेळत होती तिने मोठ्याने आरडाओरडा केला. जवळच असणारे शेतकर्‍यांनी तो आवाज ऐकला  आणि शेततळ्याकडे धाव घेतली. तोपर्यंत ही दोन्ही मुले शेततळ्यात पूर्णपणे बुडाली होती. त्यांना त्वरित नगर येथे दवाखान्यात नेण्यात आले परंतु त्यांचे प्राण वाचले नाहीत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले

चारच महिन्यापूर्वी चिचोंडी पाटील चे माजी सरपंच अमोल धोंडिबा कोकाटे यांची शाळेत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे शेततळ्यांपासून संरक्षणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post