खा.डॉ.अमोल कोल्हे होम क्वारंटाईनमाय अहमदनगर वेब टीम
पुणे  - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोन राजकीय नेते करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समजल्यानंतर कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन झाले आहेत.

एक जून ते चार जून या कालावधीत मतदारसंघाच्या दौर्‍यावर असणार्‍या खासदार डॉ. कोल्हे यांचा या दौर्‍याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी तत्काळ स्वत:ची करोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव आलेली आहे. त्यांच्यामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

डॉ. कोल्हे सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौर्‍यावर येतात. त्यावेळी काही वेळा कार्यक्रमांदरम्यान नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. अशा स्थितीत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post