‘अभियांत्रिकी’ ला सुकाळ! ; प्रवेश पात्रतेमध्ये होणार सुधारणा
माय अहमदनगर वेब टीम
नोकरीच्या मुबलक संधी नसल्याने व महाविद्यालयांची वाढती संख्या यामुळे अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवित असल्याचे चित्र यापूर्वी पाहायला त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांतील हजारो जागा प्रवेशाविना रिक्त राहत होत्या. मात्र आता राज्य सरकारने अभियांत्रिकीसह इतर तांत्रिक अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी प्रवेश व पात्रता नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाच्या जागा रिक्त जागा राहण्याचे प्रमाण कमी होऊन अभियांत्रिकीला सुकाळ येण्याची आहे.

12वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य देतात. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत.

यंदा करोनामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ङ्गसीईटीफ परीक्षा वारंवार ढकलली जात आहे. त्यामुळे यंदा प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडणार आहे. तसेच पालक, विद्यार्थ्यांना दुसर्‍या शहरात शिक्षणासाठी पाठविण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

यावर तोडगा म्हणून प्रवेश वाढविण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागात हालचाली सुरू आहेत. याबाबत या खात्याचे मंत्री उदय सामंंत राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रवेश पात्रता व नियम यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येतील.

यामुळे राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्यातच शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. अशी माहिती दिली आहे.

अभियांत्रिकी प्रवेश घेण्यासाठी मफिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ (पीसीएम) या तीन विषयात 12वीला किमान खुल्या 150 गुणांची तर आरक्षीत गटासाठी 135 आवश्यकता आहे. त्याऐवजी ही अट अनुक्रमे 135 व 120 गुणांची केली जाऊ शकते.

दरम्यान, शासनाकडून अभियांत्रिकी व तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पात्रता व नियमांमध्येच बदल झाल्यास हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणे शक्य होणार आहे.

अभियांत्रिकीसह इतर तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमात आणली जाणार असल्याने संस्थांमध्ये प्रवेश वाढून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, हे विद्यार्थी प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन शेवटच्या वर्षापर्यंत जातील का? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे.
प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षाच्या एटीकेटी व बॅकलॉग परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना कमीत कमी गुणांनी पास करावे. विद्यार्थी जास्त मानसिक तणावात आहेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर, याविषयी लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post