लिंबू बाजार भावाची कोंडी




माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुका लिंबू फळबागाचे आगार समजले जात असल्याने लिंबू उत्पादनात तालुका अग्रेसर असल्याने इथले लिंबू देशाच्या कानाकोपर्‍यात जाते.

मात्र मागील चार महिन्यांपासून लिंबाच्या बाजारभावाने शेतकरी हतबल झाला असून लिंबाला अवघा तीन ते पाच रुपये बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थितीत तहसिलदार महेंद्र माळी आणि बाजार समिती तसेच लिंबू खरेदी करणारे व्यापारी तालुक्यातील शेतकरी यांची बैठक झाली.

यात तोडगा निघाला मात्र असे असताना लिंबू व्यापारी यांनी या बैठकीनंतर देखील तीन ते पाच रुपये किलोने लिंबू खरेदी केलेे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post