इक्विटीसाठी एक जुलैपासून बदले मार्जिनचे हे नियम
माय अहमदनगर वेब टीम

इक्विटीत मार्जिन काय आहे?

इक्विटी श्रेणीत ट्रेडिंग नेहमी मार्जिन नियमांंतर्गत येतात. क्लिअरिंग कॉर्पाेरेशन स्टॉक ब्रोकर्सकडून मार्जिन संकलित करत राहतात. उदाहरणार्थ एखादा गुंतवणूकदार १ लाख रुपयांचे शेअर खरेदी करत असेल व त्या शेअरवर व्हीएआर व ईएलएम मार्जिन ७.५० आणि ५ टक्के असेल तर सध्याच्या नियमांनुसार ब्रोकर्सच्या भांडवलातून १२,५०० रुपये ब्लॉक केले जातात.


१ जुलै २० पासून बदल काय?
आधी मार्जिनची आवश्यकता ब्रोकरची जबाबदारी होती आणि त्यांना क्लिअरिंग कॉर्पाेरेशनसोबत पुरेशी ठेव ठेवावी लागत असे. ब्रोकरने त्याची ग्राहकाकडूनही वसुली करावी हे आवश्यक नव्हते. हे केवळ डेरिव्हेटिव्ह श्रेणीसाठी आवश्यक होते. १ जानेवारी २०२० कॅश मार्केटसाठी ग्राहककडून केलेल्या नव्या ट्रेड्सवर अपफ्रंट मार्जिन्स एकत्र करणे व रोज अनिवार्य केले होते. मात्र, डेरिव्हेटिव्ह श्रेणीव्यतिरिक्त इक्विटी एकत्रित अल्प मार्जिनवर दंडवसुलीची कोणतीही तरतूद नव्हती. मात्र,१ जुलै २०२० पासून शॉर्टफॉलची मात्रा त्याच्या वारंवारितेच्या आधारावर दंडाचा आकार शॉर्टफॉलच्या ०.५०% ते ५% होईल.


मार्जिनचे प्रकार काय आहेत आणि कधी एकत्र केले पाहिजेत?
मार्जिन दोन घटकांत विभागले जाऊ शकते. व्यवसायाआधी दिले जाणारे मार्जिन उदा. व्हीएआर व ईएलएम आणि एमटीएम तसेच अन्य मार्जिन जो निपटाऱ्यावर घेतला जातो. आतापर्यंत गुंतवणूकदारांकडे(बहुतांश ऑफलाइन, स्मॉल ब्रोकर्सद्वारे ट्रेडिंग करणारे) शेअर खरेदी करणे आणि निपटाऱ्यादिवशी पेमेंट करण्याचा पर्याय आहे. मात्र सर्व प्रमुख ऑनलाइन व राष्ट्रीय स्तराच्या ब्रोकर्सनेही त्यांच्या ट्रेडिंग सिस्टिममध्ये या आवश्यकतेचा समावेश केला आहे. ट्रेड अपफ्रंट मार्जिनपेक्षा पुढे जाऊ नये यासाठी ते केले आहे.


यात समस्या काय आहे?
डेरिव्हेटिव्हशिवाय इक्विटी श्रेणी व्यवसायात मार्जिन्स खरेदी करताना व विकताना दोन्हींवर लागू होते. यामुळे क्लायंटला विकण्याच्या दिवशी ब्रोकरला शेअर डिलिव्हरी करणे आवश्यक असते वा मार्जिन समान रक्कम ट्रान्सफर करावी लागते. एका दिवस आधी खरेदी असेल व क्लायंटने शेअर विकल्यास समस्या होऊ शकते. कारण त्याचा निपटारा टी+२ िदवसांत होईल.

ईएलएम | हा अतिरिक्त ठरलेला मार्जिन असतो, जो शेअरवर वसूल केला जातो.
व्हीएआर मार्जिन | हे अस्थिरतेशी संबंधित आहे. हे दिवसात सहादा बदलले जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post