कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांमधील गांभीर्य झालेय कमी,



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांमधील कोरोनाबाबतचे गांभीर्य मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन वारंवार आवाहन करत असताना नागरिक मात्र प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाला आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजना करण्याबरोबरच नियम मोडणार्‍यांवरही कारवाई करण्यासाठी आपली शक्ती वाया घालवावी लागत आहे. नगर शहरासह जिल्ह्यात 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असताना नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर झपाट्याने वाढली.

जिल्ह्यात महिनाभराच्या कालावधीत एकूण बाधित रुग्णांची संख्या तब्बल 646 वर पोहचली आहे. त्यात शहरात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला आहे. एकट्या नगर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 250 च्या जवळ पोहचली आहे. शहरातील तोफखाना परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. त्यामुळे या भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरात तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव व आडतेबाजार असे चार कन्टेन्मेंट झोन आहेत. त्यात पद्मानगर येथे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा भागही कन्टेन्मेंट झोन झाला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नगर शहर व भिंगारमध्ये कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर महापालिका हद्द व भिंगार छावणी परिषद हद्दीमध्ये शुक्रवार (दि.3) पासून 17 जुलैपर्यंत सायंकाळी 7 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

महापालिकेच्या दक्षता पथकाकडून 5 दिवसात तब्बल 2 लाखाचा दंड वसूल

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दक्षता पथक (व्हिजिलन्स स्क्वाड) नेमलेले असून या पथकाने वेळेपूर्वी दुकान उघडण्याबद्दल व मास्कचा वापर न करणार्‍या नागरीकांवर गेल्या 5 दिवसांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करत तब्बल 2 लाख 3 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

या दक्षता पथकात पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते, यंत्र अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. नरसिंग पैठणकर, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, राजेंद्र सामल, बाळासाहेब विधाते, महापालिका कर्मचारी सर्वश्री विजय बोधे, गणेश लायचेट्टी, राहुल साबळे, बाळासाहेब पवार, अशोक बिडवे, राजेश आनंद, रवींद्र सोनावणे, किशोर जाधव, भास्कर अकुबत्तीन, पोलीस कॉ. श्रीकांत खताडे,पो.कॉ. शरद गांगर्डे, पो.कॉ. ए.टी. वामन, पो.कॉ. जे.एल.लहारे, पो.कॉ.महादेव निमसे, पो.कॉ. नितीन फुलारी यांचा समावेश आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये ही कारवाई केली जात आहे.

संचार बंदीचेही मोठ्या प्रमाणावर होतेय उल्लंघन

नगर शहर व भिंगारमध्ये कोरोना विषाणुची बाधा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर महापालिका हद्द व भिंगार छावणी परिषद हद्दीमध्ये शुक्रवार (दि.3) पासून 17 जुलैपर्यंत सायंकाळी 7 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी 26 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संचारबंदीचेही मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना दिसत आहे. या 26 पैकी 12 पथकांकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार या 12 पथकांनी 59 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 33 हजारांचा दंड वसूल केला आहे. इतर पथकांकडूनही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे.

पोलिस व आरटीओच्या पथकाकडूनही कारवाई

दरम्यान, जिल्हाधिकारी यांना नेमलेले पथक तसेच महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या पथकाकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असताना, पोलिस प्रशासन व आरटीओ कार्यालयाकडूनही नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यामध्ये गेल्या तीन-चार दिवसात 289 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली. यामध्ये पीयुसी सर्टिफिकेट नसणे, बिगरनोंदणी केलेली वाहने, हेल्मेट नसणे, सीटबेल्ट न लावणे, वाहनांचा विमा संपलेला असणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, वेगात वाहने चालवणे, नंबरप्लेट नियमानुसार नसणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे आदी प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस यंत्रणा, आरटीओ कार्या

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post