मान्सून मध्ये खा हे फळ; यांचे आहेत भरपूर फायदेमाय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - मान्सूनमध्ये बाजारात हमखास मिळणारं फळ म्हणजे पेर. हे फळ अगदी छान रसाळ आणि चवीलाही चविष्ट तर असतंच पण यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत. जे आपल्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. कारण यामध्ये मिनरल, पोटॅशिअम, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के, फायबर, बी कॉम्प्लेक्सचं प्रमाण भरपूर असतं. पेर खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते, रक्ताभिसरणही चांगलं होतं आणि हाडांना बळकटी येते. चला जाणून घेऊया हे फळ खाल्ल्याने आपल्या आरोग्याशी निगडीत कोणत्या समस्या दूर होतात.

नाशपती, पिअर्स खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही मर्यादित राहते. मेंदू व ग्रंथींच्या आजारांना घातक अशा ‘फ्री रॅडिकल्सना’ ते प्रतिबंध करते. पचन, श्वसन यांना अनुकूल आणि सोयारसिस यासारख्या त्वचारोगांना ते नियंत्रणात ठेवते. त्वचारोगातही ‘अ‍ॅव्हाकॅडोची’ पेस्ट त्वचेखालील रंगपेशींचे रक्षण करून विषारी द्रव्यांचा नायनाट करते.

हे फळ इम्यून सिस्‍टम म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ही फारच उपयोगी आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात वारंवार आजारी पडणाऱ्यांनी हे फळ नक्की खावं. कारण हे फळ तुमची इम्‍यूनिटी वाढवून छोट्या-मोठ्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. याशिवाय नासपती खाण्याने शरीरातील ग्लुकोज एनर्जीमध्ये परिवर्तित होतं. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा एनर्जीसाठी तुम्ही पेर खाल्ल्यास लगेच एनर्जेटीक वाटेल.

पेर अँंटीऑक्सीडंट आणि फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. मध्यम आकाराच्या एका पेरात 6 ग्रॅम फायबर असतं. जे 50 वर्षाच्या महिलांच्या रोजच्या 24 टक्के गरजेला पूर्ण करतं. याशिवाय पेरामधील पॅक्टीन नावाच्या तत्तवामुळे तुम्हाला बद्धकोष्ठाची समस्या असल्यास तीही दूर होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post