...अन्यथा एमआयडीसी ऑफिस बंद आंदोलन करू


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-  आंबेडकर चौक, आदर्श नगर भागात एमआयडीसी मधील कारखान्याचे सांडपाणी नागरी वस्तीमध्ये घुसले आहे त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत तसेच येथील रस्त्याचे देखील मोठे नुकसान होते आहे. हा प्रकार वारंवार होते असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत, अशा परिस्थितीत अहमदनगर युवक काँग्रेसचे शहरजिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष मोसिन शेख, सुजय गांधी, प्रज्वल त्रंबके, उमेश रासकर आदींनी समक्ष जाऊन ही समस्या समजून घेतली व येथील नागरिकांशी संवाद साधला व त्यावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. एमआयडीसीतील कारखान्यांच्या सांडपाण्याची सुरळीत व्यवस्था करा ज्याने करून लगतच्या नागरी वस्तीत पाणी घुसणार नाही असे निवेदन एमआयडीसी आयुक्तांना दिले आहे, यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते एमआयडीसी ऑफिसचे गेट बंद करून आंदोलन करतील असा आक्रमक इशारा आयुक्त गणेश वाघ यांना बोलताना मयूर पाटोळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर प्रभाग 7 मधील ड्रेनेज लाईन ची व्यवस्था देखील कमकुवत आहे असे निदर्शनास आले आहे त्यासंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेणार आहोत असे युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post