पद्मानगरनंतर आता पंचवटीनगर सील
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - करोनाबाधितांची आकडा वाढत चालल्याने महापालिका प्रशासनाने चितळे रोड आणि सावेडीतील भिस्तबाग चौकात नव्याने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे. चितळे रोडची मुदत 25 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत, तर भिस्तबाग येथील कंटेनमेंची मुदत 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल.

मार्चपासून आजपर्यंत नगर शहरात आजपर्यंत 46 कंटेनमेंट झोन महापालिकेने केले. मुकुंदनगरपासून ते माळीवाडा, झेंडीगेट, केडगाव, नालेगाव, तोफखाना, दाळमंडई, सथ्था कॉलनी, भवानीनगर येथे टाकलेले कंटेनमेंट झोन पहिल्यादांच सावेडीत पोहचला. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता वेळप्रसंगी नगरशहर लॉकडाऊन करण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाने समोर ठेवला असल्याची माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

नगर शहरासह उपनगरात करोनाबांधिताची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या चारही बाजूने नव्याने करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच नगरसह उपनगरात देखील करोनाने हातपाय पसरले आहे. बाधित परिसरदेखील महापालिका तातडीने सील करत आहे.

नगर शहरातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या दोनशे पार गेली आहे. दरम्यान रविवारी महापालिका प्रशासाने भिस्तबाग, श्रमिक नगर, लक्ष्मीकारंजा परिसराची पाहणी केली. त्यानंतर लगेचच चितळे रोड परिसरातील लक्ष्मीकरांजा कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे.

दरम्यान नगर शहरात सध्या सिद्धार्थनगर, तोफखाना, पद्मानगर, बागरोजा हडको, कवडे नगर, नंदनवन कॉलनी (बुरुडगाव रोड), लक्ष्मी कारंजा असे सात कंटेन्मेंट झोन आहेत. सध्याच्या परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन झाले आहे. दरम्यान नगर शहरात कोरोनाचा संसर्ग न थांबल्यास शहरच लॉकडाऊन करण्याच्या पर्याय आमच्यासमोर असल्याची माहिती महापालिका प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

कंटेनमेंट झोन - चितळे रोड, मिरावली दर्गा चौक, नगर वाचनालय, चित्रा टॉकीज गल्ली, लक्ष्मीबाई कारंजा परिसर. बफर झोन - पापय्या गल्ली, रंगार गल्ली, महाजन गल्ली, गांधी मैदान, नेता सुभाष चौक, छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्केट ते पटवर्धन चौक.
कंटेनमेंट - भिस्तबाग, अयोध्यानगर, कौशल घर, सुपर क्लिनर्स, उत्तरेकडील ओढा, शेंदूरकर घर, पिंपरकर घर, मचे घर ते कौशल घर बफर झोन - अयोध्येनगरी ते पूर्वेकडील कौशल नगरी, गजानन कॉलनी, संगीतनगर, दक्षिणेकडील सिमला कॉलनी, दत्त मंदीर परिसर, विवेकानंद कॉलनी, विठ्ठल मंदीर परिसर, पश्चिमेकडील आशियाना कॉलनी, साईबन कॉलनी, उत्तरेकडील किसनगिरीबाबा नगर.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post