14 दिवसांनंतर नगर शहरातील बाजारपेठेचा परिसर झाला खुला




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली आडते बाजार, दाळमंडई परिसरातील कन्टेन्मेंट आणि बफर झोनचा कालावधी रविवारी (दि.12) रात्री 12 वाजता संपुष्टात आल्याने या बाजारपेठेचा परिसर सोमवारी (दि.13) सकाळपासून तब्बल 14 दिवसांच्या कालखंडानंतर खुला करण्यात आला आहे.

शहरातील घाऊक आणि ठोक विक्रीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या आडतेबाजार परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर 14 दिवस कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कोठला, ब्राम्हण कारंजा, अंबिका हॉटेल, हेमराज मेडीकल, रामचंद्रखुंट, अनिलकुमार पोखरणा अ‍ॅण्ड सन्स, तपकीर गल्ली, शामसुंदर रामचंद्र हेडा, रांका ट्रेडर्स, आडते बाजार कोपरा, जगदाळे ज्वेलर्स, गंजबाजार, मालु पेंटस, मोहन ट्रंक डेपो, एस.एस मेहेर, फुटाणे गल्ली, संचेती साडी, पोपटानी एजन्सी, पाचलिंब गल्ली, कुबेर मार्केट, दाळमंडई, मिरा मेडीकल चौक, बॉम्बे फर्निचर, सीपी मुथ्था, ग्राहक भांडार चौक, राजेंद्र हॉटेल ते ब्राम्हण कारंजा या परिसराचा समावेश होता.

या शिवाय शनिगल्ली, झेंडीगेट, पोखरणा हॉस्पीटल सुभेदार गल्ली, नालबंदखुट, पिंजार गल्ली पारशाखुट, जुना कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, सारडागल्ली, कापडबाजार, शहाजीरोड, तांबटकरगल्ली, तेलीखुंट पॉवर हाऊस, नालामस्जीद, स्मिता मेडीकल, तेलीखुंट, सर्जेपुरा चौक, मनपा शाळा, बेलदार गल्ली, मक्का मस्जीद, जे.जे.गल्ली, कोंड्यामामा चौक, राज चेंबर, कोठला. हा परिसर 12 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बफर झोन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे 14 दिवस बाजार पेठ बंद होती.

पत्रे लावून बंद केलेले अंतर्गत रस्ते झाले खुले

कन्टेन्मेंट झोन झाल्यानंतर या कन्टेन्मेंट झोनमधील सर्व अंतर्गत रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले होते. मात्र रविवारी (दि.13) मध्यरात्री 12 वाजता कन्टेन्मेंट झोनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सोमवारी (दि.13) सकाळीच महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी या परिसरातील पत्रे लावून बंद केलेले सर्व अंतर्गत रस्ते खुले केले आहेत. तसेच बाजारपेठेतील सर्व दुकानेही व्यापार्‍यांनी सुरु केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post