राज्यात आज ‘कोरोना’च्या २०४ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद तर



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २०४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २०४ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-६, ठाणे मनपा-१०, नवी मुंबई मनपा-२८, कल्याण-डोंबिवली मनपा-२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-५, वसई-विरार मनपा-१३, पालघर-१, रायगड-१, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-१३, अहमदनगर-१, धुळे-३, धुळे मनपा-२, जळगाव-१२, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-१३, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-५, सातारा-४, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-७, जालना-५, लातूर-१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड-१, अकोला-१, अकोला मनपा-२, अमरावती मनपा- १, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post