नगर शहर काँग्रेसचे 'मिशन पॉझिटिव्ह सोच' अभियान - किरण काळे


 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर:  किरण काळे यांच्या संकल्पनेतून  शहर काँग्रेसच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,  युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली  नगर शहर काँग्रेस आणि  शहर युवक काँग्रेसची टीम या अभियानाच्या यशस्वीतेसाठी  काम करीत आहे.

 

१ ऑगस्ट पासून या अभियानाला सुरुवात होत आहे. अभियानाच्या संकल्पनेविषयी माहिती देताना काळे म्हणाले कीमिशन पॉझिटिव्ह सोच अभियानामध्ये नगर शहरातील विविध सामाजिकआर्थिक घटक यामध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी होणारे शहरातील सामान्य नागरिकअधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हे कोरोनाच्या संकट काळामध्ये  आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे पाहिले पाहिजेसंकटावर कशा प्रकारे मात केली पाहिजेएकमेकांना आधार देत कसे पुढे गेले पाहिजेस्वतःचा कोरोना  पासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत फेसबूकट्विटरव्हाट्सअपइंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून नगरकरांना प्रेरित करण्याचेत्याचबरोबर जनजागृती करण्याचे काम करणार आहेत.

 

यामध्ये नगर शहरातील सफाई कामगारबँक कर्मचारीवर्तमानपत्र घरोघर जाऊन टाकणारे पेपर विक्रेतेपरप्रांतीय नगरकरविविध धर्मांचे धार्मिक गुरुसीएफिटरदूध डेअरी चालककोरोनावर मात करून बरे झालेले नगरकरकोरोना झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीयवकीलकलाकाररिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलाहॉटेल व्यवसायिकव्यापारी,  उद्योजकशालेय विद्यार्थी - विद्यार्थिनीमहाविद्यालयीन युवक - युवतीगृहिणीज्येष्ठ नागरिककटिंग सलून चालकपेट्रोल पंप कामगारडॉक्टरमेडिकल चालकवॉर्डबॉयनर्सभाजी विक्रेतेफळ विक्रेतेकिराणा दुकानदारकोवीड हॉस्पिटल चालकपोलीस प्रशासनरात्री सात नंतर चौकाचौकात उभे राहून  काम करणाऱ्या पथकातील कर्मचारी आदी यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.

 

सात दिवस चालणाऱ्या या अभियानामध्ये दररोज वरील विविध घटकातील लोक सोशल मीडियाद्वारे नगर शहरा मधील नागरिकांना व्हिडिओच्या माध्यमातून सकारात्मक संदेश देत त्यांना संबोधित करणार आहेत. स्वतःचे अनुभव सांगत जनजागृती करणार आहेत.

 

या अभियानामध्ये महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातआ.डॉ. सुधीर तांबेयुवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे देखील नगर शहरातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.

 

" हे अभियानाचे घोषवाक्य आहे. मिशन पॉझिटिव्ह  सोच  अंमलबजावणीसाठी शहर युवक काँग्रेसचे भरीव योगदान असणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मयूर पाटोळेमुबीन शेखयोगेश काळेअन्वर सय्यदगणेश भोसलेडॉ. साहिल पटेलअमन तिवारीसुजय गांधीदीपक घाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत.

 

 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post