महापालिकेची 29 जुलैला सर्वसाधारण सभा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातून वाहणार्या सिना नदीची पुररेषा राज्य शासनाच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आली असून या सिना नदीसह मुख्य नाल्याची पुररेषा विकास योजना आराखड्यावर अंतर्भूत करुन त्याची अंमलबजावणी करण्याचा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. या विषयाला मंजूरी देण्यासाठी महापालिकेची 29 जुलै रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या आदेशानुसार नगर सचिव एस. बी. तडवी यांनी बुधवारी (दि.22) सायंकाळी उशिरा या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा ही 29 जुलै रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या 3 जुलैच्या पत्रानुसार ही सभा होणार आहे. सभेपुढे 18 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
यामध्ये महापालिकेच्या हद्दीतून वाहणार्या सिना नदी व मुख्य नाल्याची पुर रेषा विकास योजना आराखड्यावर अंतरर्भूत करुन त्याची अंमलबजावणी करणे, महापालिकेच्या हद्दीत सिना नदीमध्ये जाणार्या 7 नाल्यांचा जिर्णोद्धार करणे कामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे, बुरुडगाव शिवारात दैनंदिन 50 मैट्रीक टन क्षमतेचा कचरा खत प्रकल्प उभारणे व 1 वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती कामी देण्यासाठी एकत्रीत ई-निविदा मागविणे, सावेडी येथील सर्व्हे नं.289 मधील महापालिकेचा कचरा डेपो इतरत्र हलवून त्या ठिकाणी स्मशानभूमी, उद्यान व मल्टीपर्पज क्रीडा संकुल विकसीत करणे, एकात्मीक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम ांतर्गत वारुळाचा मारुती व काटवन खंडोबा येथील बांधण्यात आलेल्या कम्युनिटी सेंटर सेवाभावी संस्थेस भाडेतत्वावर चालविण्यास देणे, पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया पार पाडणेसाठी नवीन अंदाजपत्रकीय तरतूद निर्माण करणे, उत्पन्नाच्या वाढीसाठी खासगी करणाच्या माध्यमातून बीओटी तत्वावर महालक्ष्मी उद्यान व सिद्धीबाग उद्यान चालविण्यास देणे, महापालिका हद्दीतील आरक्षण क्र.216 अ या आरक्षणाखाली जमिनीचे भूसंपादन करणे, गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा 15 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासाबाबत निर्णय घेणे, महापालिका कर्मचार्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपूर्ती देयक अदा करणे अशा विविध विषयांचा समावेश आहे.
Post a Comment