गुडन्यूज: कराेना लस 15 ऑगस्टपर्यंत येणार ?माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - करोनावरील लस भारतातच तयार केली जात असून, कोवाक्सिन असे या लसीचे नाव आहे. 15 ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषद अर्थात् आयसीएमआरने शुक्रवारी दिली.

ही लस तयार करीत असलेल्या भारत बायोटेक या हैदराबादच्या फार्मा कंपनीला 15 ऑगस्टपर्यंत वैद्यकीय चाचणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 7 जुलैपासून ही चाचणी सुरू केली जावी आणि यात विलंब व्हायला नको, या चाचणीचे निष्कर्ष आल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत ती उपचारासाठी आणली जाऊ शकेल, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

भारत बायोटेकला भारतीय औषधी महानियंत्रक या संस्थेने लसीच्या मानवी चाचणीला परवानगी दिली होती. कोवाक्सिन नावाची ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही)च्या सहकार्याने तयार केली आहे.

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक पत्र जारी करून, 7 जुलैपासून लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात यावी, असे म्हटले आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post