..हे करा आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो, तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खाणे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवण्याचा उत्तम उपाय आहे.

आपण दररोज १,५०० मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खात असाल, तर ते आरोग्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशरसाठी चांगली बाब आहे. त्यामुळे हृदय विकार आणि रक्तदाब यावरील आजारांसाठी लढण्यासाठी एक चांगला उपाय ठरू शकतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनने याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, प्रत्येक माणसाने दररोज १,५०० मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे.

अभ्यासकांच्या मते १,५०० मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले, तर उच्च रक्त दाबापासूनची जोखीम कमी होते. याशिवाय हृदय आणि रक्त यासंबंधित आजारांपासून सुटका होते, तर हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे कमी मीठ खाणे केव्हाही चांगले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post