दिव्यांग बांधवांसाठी उदरनिर्वाह भत्ता



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेकडून विविध लाभाच्या योजना राबविल्या जातात मात्र या योजनांचा फायदा केवळ ठराविक दिव्यांगांनाच होतो त्यामुळे गरजवंत या योजनांपासून वंचित राहत आहेत तरी सदर योजना बंद करुन पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर दिव्यांग बांधवांसाठी उदरनिर्वाह भत्ता (पेन्शन) चालू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपंग सेलचे अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांनी केली आहे.

यासंदर्भात जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ठाणगे यांनी म्हटले आहे की जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत 5 टक्के दिव्यांग निधी योजनांमध्ये दिव्यांगांना झेरॉक्स मशिन पुरवणे, दिव्यांग-दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान देणे, मतीमंदांसाठी कायमस्वरुपी औषधोपचारासाठी अर्थसहाय्य देणे, अतितीव्र/बहुविकलांग दिव्यांगांच्या पालाकांना अर्थसहाय्य देणे या योजना दरवर्षी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडील दिव्यांग सेस निधी अंतर्गत घेतल्या जातात. परंतु या योजना आपण घेतो त्याचा लाभ फक्त ठराविक दिव्यांग बांधवांना होतो.

परंतु ज्या दिव्यांगांना खरी या योजनांची गरज आहे त्यांना ती भेटत नाही. त्यामुळे या योजनेपासून ते वंचित राहतात. त्यामुळे या योजना बंद करुन पुणे जिल्हा परिषद धर्तीवर पेन्शन योजना चालू करावी.

जिल्हा परिषद पुणे व जिल्हा परिषद त्या अनुषंगाने जिल्हा परिषद हद्दीतील गावनिहाय सर्व्हे करुन दिव्यांग बांधवांचे अर्ज घेण्यात यावे व त्यांना दर महिन्याला पेन्शन चालू करण्यात यावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post