चेकपोस्टला अज्ञात वाहनाची धडकमाय अहमदनगर वेब टीम
जामखेड  – करोनाच्या पार्श्वभूीवर शहरात शहरात चेकपोस्टवर नियुक्तीवर असणार्‍या कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपास रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बांबू व खुर्च्या तोडून नियुक्तीवर असणार्‍या शिक्षकाला धडक दिल्याने शिक्षकाच्या डोक्याला पायाला व कमरेला मार लागला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चेकपोस्टवर सुविधांचा अभाव समोर आला आहे.

जामखेड तालुक्यात सहा चेकपोस्टवर पोलीसांना मदत म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस बारा तास नियुक्ती देण्यात आली आहे. तर काॅरन्टाईन केंद्रावर दररोज आठ तास नियुक्ती देण्यात आली आहे. चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. बॅरिकेटर्स आहेत त्यावर रेडिअम लावणे आवश्यक आहे पण ते नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ते दिसत नाही. तसेच चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे परंतु तेही नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत.

कोठारी पेट्रोल पंपावर एका आयशर टॅम्पोने बॅरिकेटर्स उडविले तर लक्ष्मी चौकात रात्री आठ ते सकाळी आठ नियुक्तीवर असणारे शिक्षक उदयकुमार दाहितोडे राजकुमार थोरवे व होमगार्ड दगडे हे नियुक्तीवर होते रात्री ११. ३० ते ११.४५ च्या दरम्यान एका अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याने मंडपाचे बांबू तोडून मंडपातील तीन खुर्च्या मोडतोड केली व खुर्चीवर बसलेले शिक्षक उदयकुमार दाहितोडे यांना धडक दिल्याने ते खाली पडले त्यांच्या डोक्याला पायाला व कमरेला चांगला मार बसला मोटारसायकलस्वार पसार झाला चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे. मंडपाशेजारी पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डासांचा उपद्रव असतो अशा ठिकाणी बारा तास शिक्षकांना थांबावे लागत आहे. तसेच ५५ वर्षांवरील शिक्षकांना व जे आजारी आहेत त्यांनाही नियुक्ती दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

काम करण्यास सर्व शिक्षक तयार आहेत पण बरोबर पोलीस हवेत तसेच चेकपोस्टवर सुविधांचा अभाव आहे मंडपाच्या बांबूला रेडिअम लावणे गरजेचे आहे. व बारा तासाऐवजी आठ तास दिवटी द्यावी व बरोबर पोलीस हवेत अशी मागणी करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post