फी वसुलीचा तगादा लावणार्‍या 'त्या' शाळांची चौकशी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – फी वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावणार्‍या शहरातील चार मोठ्या शाळांची चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

अहमदनगर शहरातील तसेच जिल्ह्यातील शाळांबाबत फि वसुली व ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मनसेने निवेदन पाठवले होते तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन काही शाळांची फी वसुली चालू असल्याचे पुरावे सादर केले होते. त्याची दखल घेत शिक्षणाधिकारी व मनसेचे पदाधिकारी यांची 19 जून रोजी शिक्षण अधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली व मनसेच्या नितीन भुतारे यांच्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षणाधिकारी यांनी शहरातील चार बड्या संस्थांच्या शाळांची चौकशी सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणाबाबत सरकारच्या 15 जून 2020 च्या परिपत्रकानुसार नर्सरी ते दुसरी पर्यंत च्या सर्व माध्यम व बोर्डाच्या शाळांना ऑनलाईन शिक्षण देता येणार नाही, तसे शिक्षण चालू असल्यास त्या संबंधित शाळांवर कारवाई करणार व ताबडतोब शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना आदेश काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन डिजिटल शिक्षण हे शासनाच्या परिपत्रकानुसार इयत्ता तिसरी ते पाचवी 1 तास प्रतिदिन, सहावी ते आठवी 2 तास प्रतिदिन, नववी ते बारावी 3 तास प्रतिदिन याप्रमाणे शिकवणे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन विध्यार्थ्यांना मोकळा वेळ ब्रेक देणे त्यामध्ये गरजेचे आहे, अशा पद्धतीने जर शिक्षण शाळेंनी दिले नाही जर शिक्षणाचा अतिरेक झाला व तसेच शाळांनी फी वसुलीचा तगादा लावला तर शिक्षणाधिकारी संबधित शाळांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

या बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी शासनाचे आलेले 15 2020 चे परिपत्रक मनसेचे नितीन भुतारे यांना दिले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनाची दखल योग्य प्रकारे घेतल्यामुळे मनसेच्या पदाधिकारी यांनी शिक्षणमंत्री व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले. यावेळी नितीन भुतारे यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, परेश पुरोहित, श्रीराम शिंदे, रतन गाडळकर आदी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post