वटपूजा’फ्रॉम होम’


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - नाशिक शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजच्या वटसावित्री पोर्णिमेवर करोनाचे सावट असल्याचे दिसुन आले. दरवर्षीप्रमाणे यंदा परिसरातील वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी बहुतांशी महिर्ला निघाल्याच नाही. तर बहुतांशी माहिलांनी घरात वडाची फांदी किंवा झाडाची प्रकृती ठेवून याची मनोभावे पुजन करुन वटपोर्णिमा साजरी केली.

नाशिक जिल्ह्यात व शहरात करोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला असुन दिवसेंदिवस बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले कुटुंबीय व मित्रमंडळी करोनाचे शिकार होऊ लागले आहे. याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असुन सामाजिक अंतर, तोंडाला मास्क व सॅनेटाईटरींग याचा वापर होत नसल्याचे याचे परिणाम आता दिसुन लागले आहे. या निर्माण झालेल्या भीतीच्या सावटाखाली आज सर्वत्र वटसावित्री पोर्णिमा पुजन झाले.

दरवर्षी प्रमाणे वडाच्या झाडांजवळ होणारी महिलांची गर्दी दिसलीच नाही. तसेच या झाडावर जातांनाही महिलांनी सामाजिक अंतर पाळल्याचे दिसुन आले. तसेच दूर अंतरावर आलेले वडाचे झाड असल्याने महिलांनी वडाची फांदी घरात व सोसायटीत आणुन तिची मनोभावे पुजन करीत जन्मो जन्मी हाच पती लाभो अशी प्रार्थना केली. शहरात अनेक ठिकाणी महिला वर्गांनी पारंपारिक पध्दतीने वडाजवळ न जाता घरातच वटपोर्णिमा साजरी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post