जपानी कंपनी नगरमध्ये सुरू करणार उद्योग

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने 16 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार 17 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पहिला 900 कोटी रुपयांचा गुंतवणूक करार डीबीजी इस्टेट कंपनीसोबत करण्यात आला. याद्वारे 2700 नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. ही कंपनी मेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी लॉजिस्टिक पार्क तयार करणार आहे. ही कंपनी भिवंडी येथे लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणार आहे.

दुसरा गुंतवणूक करार जपानच्या आयडीयल केमी प्लास्ट कंपनीसोबत 117 कोटींचा करण्यात आला आहे. ही कंपनी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथे आपला उद्योग सुरू करणार आहे. या ठिकाणी 88 जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. संबधित कंपनी या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post