पॉझिटिव्ह अहवालासह करोना बाधित मुंबईहून नगरला आला


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मुुंबईला कर्करोगाच्या उपचारासाठी गेलेला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी उपचार न करता त्याला थेट नगरला धाडण्यात आले. या ठिकाणी आल्यानंतर तो अहवालासह जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. हा प्रकार पाहून जिल्हा रुग्णालय प्रशासन आवक झाले. अखेर संबंधीत रुग्णावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे करोना नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

नगर शहरातील सारसनगर येथील 58 वर्षे करोना बाधित रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतरही या रुग्णाला केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आले. ही व्यक्ती शुक्रवारी नगरला आली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर त्याचा स्त्राव नमुना पुन्हा घेण्यात आला. शनिवारच्या अहवालामध्ये तो पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. दरम्यान, बाधित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह असला तरी लक्षणाची तीव्रता कमी होती. मुंबईत वाढता संसर्गपाहून संबंधीत रुग्णांच्या मागणीनूसार त्याला नगरला पाठविण्यात आले असले असे आरोग्य विभागातील सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, नोडल अधिकारी डॉ. गाडे यांनी बाधित रुग्णावर करण्यात येणारे उपचार आणि त्याचा पॉझिटिव्ह अहवाल यापेक्षा अधिक माहिती दिली नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post