छत्रपतींचा आदर्श युवकांसाठी प्रेरणादायी ः महापौर बाबासाहेब वाकळे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : सर्व जाती धर्मातील मावळे एकत्र करुन सामान्य रयतेचे स्वाभिमानी राज्य निर्माण करणारे राजे म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख होय. बुध्दी चातुर्यावर महाराजांनी रयतेच्या राज्यासाठी तो दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला. या दिवशी रयतेला समर्पित होऊन कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. जुलमी शक्ती नेहमी समाजावर अन्याय करण्याचे काम केले. त्यांना छत्रपतींनी धुळीस मिळविण्याचे काम केले. सर्वांना समान न्याय देण्याचे काम केले. न्यायादानासाठी राज्य स्थापन केले. धर्म, साधू-संतांची नेहमीच पाठराखण करत धर्माचा अभिमान बाळगला. स्वतःच्या आयुष्यात राजाने निरंतर परिश्रम करीत स्वराज्याचा विस्तार केला. म्हणून त्यांची लोकहितकारी राजा अशी ओळख निर्माण झाली. आजच्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी व आदर्शवादी असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना महापौर बाबासाहेब वाकळे. समवेत पुष्कर कुलकर्णी, अमोल वाकळे, शिवा आढाव आदी यावेळी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post