इंग्लंडची कोनोर एमसीसी अध्यक्ष; 233 वर्षांत प्रथमच महिलेकडे नेतृत्व


माय अहमदनगर वेब टीम
लंडन - इंग्लंडची महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार क्लेयर कोनोर मेलबर्न क्रिकेट क्लबची (एमसीसी) अध्यक्ष बनेल. ते एमसीसीच्या २३३ वर्षांच्या इतिहासात अध्यक्ष बनणारी पहिली महिला ठरेल. ४३ वर्षीय क्लेयर सध्या इंग्लंड व वेल्स क्रिकेट संघाची व्यवस्थापकीय संचालक आहे. ती पुढील वर्षी एक ऑक्टोबर रोजी माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकाराची जागा घेईल. मात्र, एमसीसीच्या सदस्यांची पहिले परवानगी आवश्यक आहे. संगकाराचा कार्यकाळ या वर्षी समाप्त होत आहे. मात्र, कोविड-१९ मुळे त्याला एका वर्षासाठी वाढवला आहे. क्लेयरचा कार्यकाळ ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल. क्लेयरच्या नावाचे नामांकन स्वत: संगकाराने बैठकीत जाहीर केले. एमसीसी क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था आहे. क्लेयरने म्हटले, “एमसीसीच्या पुढील अध्यक्ष पदासाठी माझे नामांकन मिळाल्याने खूप आनंदी आहे. क्रिकेटने मला खूप काही दिले असून आता हा स न. या वेळी मी मागे वळून पाहाते तर, खूप पुढे गेली आहे असे वाटते. मी लॉर्डसवर वयाच्या १९ वर्षी पहिल्यांदा आले, तेव्हा महिलांचे लॉन्ग रूममध्ये स्वागत केले जात नव्हते. मात्र, आता काळ बदलला आहे. आता मला क्रिकेट मधील सर्वात ताकदवान क्लब एमसीसीला पुढे घेवून जाण्याची संधी मिळाली आहे.’ क्लेयरने १९ वर्षी १९९५ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यानंतर पाच वर्षांनी ती संघाची कर्णधार बनली. या अष्टपैलूच्या नेतृत्वात इंग्लंडने २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिकेत १-० ने हरवले होते. तेव्हा इंग्लंड टीमने ४२ वर्षांनी अशेस मालिका जिंकली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post