पुलवामामध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या नाक्यावर दहशतवादी हल्लामाय अहमदनगर वेब टीम
पुलवामा - गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी आहे. हल्ला पुलवामामधील परछू ब्रीजवर झाला. या ब्रीजवर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस कायदा सुव्यवस्थेचे पालन करत होते. या हल्ल्यात अनुज सिंह शहीद झाले, तर मोहम्मद इब्राहिम गंभीर जखमी झाले आहेत. दोघे इंडिया रिजर्व पोलिसाच्या 10 बटालियनचे होते. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने परिसरातील घेराबंदी वाढवली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
कुपवाडामध्ये आज लश्करचे तीन दहशतवादी अटक
काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलाने गुरुवारी सकाळी तीन दहशतवाद्यांना अटक केले आहे. तिघे नुकतेच दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबामध्ये भरती झाले होते. तिघांपैकी दोघांचे नाव जाकिर अहमद भट आणि आबिद हुसैन वानी आहे.
श्रीनगरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद;
श्रीनगरच्या पांडक परिसरात बुधवारी बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच, त्यांची हत्यारेदेखील बेपत्ता आहेत. यापूर्वी, शनिवारी जम्मू-काश्मीरातील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोराजवळ सुरक्षादल आणि पोलिसांच्या चेकपोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसातील हेड कॉन्स्टेबल मोहम्मद अमीन शहीद झाले.
काश्मीरमध्ये मागील 13 दिवसात 3 मोठे एनकाउंटर
-19 मे, श्रीनगर: सुरक्षादलाने डाउनटाउन परिसरा हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई होता, जो कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.
-16 मे, डोडा: सुरक्षादलाने डोडाच्या खोत्रा गावात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी ताहिरला 5 तासांच्या चकमकीनंतर मारले.
-6 मे, पुलवामा: सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला मारले. तो दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये सामील होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post