चीनच्या वुहानमध्ये मांस बंदी



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली – चीनमधल्या वुहान शहरातून जगभरात करोनाचा प्रसार झाला. करोनाचा संसर्ग वटवाघुळामुळे झाल्याचाही अंदाज चीनमध्ये वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर वुहानमध्ये जंगली प्राण्यांचं मांस विकण्यावर, खाण्यावर पुढील पाच वर्षांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. करोना व्हायरसचा कहर जगभरात पोहचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वुहान हे चीनमधलं एक शहर आहे. जे करोनाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. सर्वात आधी इथेच करोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर जगभरात करोनाचा फैलाव झाला. आत्तापर्यंत करोनामुळे जगभरात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वुहानमध्ये जंगली प्राण्यांच्या मांस खरेदी विक्रीवर आणि खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

करोनाचा प्रसार आणि लागण ही प्राण्यांपासून खासकरुन वटवाघळातून झाली असेही सांगितले जाते. तसंच वुहान हे वाईल्डलाईफ म्हणजेच वन्यजीव संवर्धन करणारं शहर आहे. तिथे त्यांना मारुन त्यांची मांस विक्री केली जाऊ नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. बुधवारपासून वन्यप्राण्यांच्या मांस खरेदी-विक्रीवर आणि खाण्यावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post