21 दिवसांचा लॉकडाउन / आता 3 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याच्या तयारीतमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिलला संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना लॉकडाउननंतरचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधनांनी संकेत दिले आहेत की, लॉकडाउनला हळु-हळू संपवले जाईल. यादरम्यान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील लॉकडाउन 3 जूनपर्यंत वाढवला जाण्याचे म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना लॉकडाउन वाढवण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे अप्पर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनीदेखील 14 एप्रिलनंतर लॉकडाउन संपणार नसल्याचे म्हटले आहे.
यापूर्वीच वृत्तसंस्थांनी म्हटले होते की, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, राज्यात 3 जूनपर्यंत लॉकडाउन सुरूच राहील. पण, नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले की, सीएमने असा सल्ला दिला आहे. याबाबत अद्याप घोषणा झाली नाही. सीएमओने सांगितले की, कोरोना व्हायरसबाबत आलेल्या एका रिपोर्टनंतर मुख्यमंत्री लॉकडाउन वाढवण्याबाबत विचार करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post