कोरोनाशी सामना करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदारांच्या पगारात 30% कपात


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -
देशात असलेल्या कोरोना संकटाला पाहता राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व खासदारांनी आपल्या एका वर्षाच्या पगारात 30% कपात करण्याचे जाहीर केले आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. यासोबतच खासदार निधीदेखील 2 वर्षांसाठी स्थगित करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, खासदार निधीमधील पैसेदेखील कोरोनाविरोधातील लढाईत वापरला जाईल. 1 एप्रिल 2020 पासून हा निर्णय लागू होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post