भारतात पहिल्यांदाच हाेणाऱ्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेला स्थगिती
माय अहमदनगर वेब टीम
झुरिच - भारतामध्ये हाेणाऱ्या फिफाच्या महिला विश्वचषक स्पर्धेला स्थगिती देण्यात आली. काेराेना व्हायरसचा वाढता धाेका लक्षात घेऊन फुटबाॅलच्या वर्ल्ड गव्हर्निंग बाॅडी फिफाने शनिवारी याची घाेषणा केली. भारतामध्ये महिलांची १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा २ ते २१ नाेव्हेंबरदरम्यान हाेणार हाेती. मात्र, आता या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली. भारताच्या पाच माेठ्या शहरांमध्ये या विश्वचषकाचे सामने आयाेजित करण्यात आले हाेते. फिफाच्या वतीने दुसऱ्या इव्हेंटसाठी भारताला यजमानपद देण्यात आले हाेते. मात्र, आता फिफाच्या भारतातील या दुसऱ्या इव्हेंटला स्थगिती मिळाली. २०१७ मध्ये भारतात १७ वर्षांखालील पुरुषांची विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती.
पुढच्या वर्षी आयाेजनाची आशा : एआयएफएफ
अखिल भारतीय फुटबाॅल फेडरेशन (एआयएफएफ) व आयाेजन समितीनेही िफफाच्या निर्णयाचे स्वागत केले. काेराेना व्हायरसचा धाेका वाढत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक माेठ्या स्पर्धांच्या आयाेजनाला स्थगिती देण्यात आली. आता भारतामधील हा वर्ल्डकप स्थगित करण्यात आला. मात्र, या स्पर्धेचे आयाेजन पुढच्या वर्षी हाेईल, अशी आशा एआयएफएफचे महासचिव कुशल दास यांनी व्यक्त केली.
Post a Comment