मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआजजनतेशी संवाद साधलासंपूर्ण जगाची अवस्था सरणार कधी रण अशी अवस्था झाली आहे. शत्रू दिसला असता महाराष्ट्रातील जनतेने त्याचे कधीच एक घाव दोन तुकडे केले असते. मात्र तो दिसत नाही हीच पंचाईत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपावयाचं आहे. मुंबई पुण्यात कोरोना रुग्ण वाढणे हे धोकादायक आहे. मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

गेले काही दिवस त्याचत्याच गोष्टी पुन्हापुन्हा सांगतोय. एक-एक दिवस उजाडतोय आणि मावळतोय. अनेक जण मला प्रश्न विचारतात.लतादीदींच्या गाण्याची आठवण झाली, सरणार कधी रण… शत्रू दिसत असता, तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते, मात्र हा अदृश्य शत्रू आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात 66 हजार 896 टेस्ट झाल्या आहेत. यातील 95 टक्के लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. साधारण 3 हजार 600 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 75 टक्के लोक सौम्य आहेत. गंभीर रुग्णांना वाचवण्याकडे आपले लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लक्षणं दिसली तर लोक वाळीत टाकतील अशा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही
जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण दिसत असले तर ती लपवू नका. फिव्हर क्लिनीकमध्ये जा. जर लक्षण दिसतं असतील तर लोकं वाळीत टाकतील का? असा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले. जर तुम्ही वेळेत आला तर नक्की बरं होता येते. काही जणांना घरी सोडलं आहे. पण तुम्ही वेळेत आला पाहिजेत, असेही ते म्हणाले.
राज्यावर आलेले संकट संपवायचे आहे
मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपवायचेआहे. मुंबई पुण्यात कोरोना रुग्ण वाढणे हे धोकादायक आहे. मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्राने मोफत अन्नधान्यात फक्त तांदूळ दिले, आम्ही गहू आणि डाळीचीही मागणी केली़
ऑरेज रेशन कार्ड असणाऱ्यांना कमी सवलतीत अन्नधान्य देत आहे. केंद्र मोफत धान्य देत आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त तांदूळ दिले. त्यामुळे आम्ही गहू आणि डाळीचीही मागणी केली आहे. डाळी आणि गहू आल्यानंतर ताबडतोब पुरवठा सुरु करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू होऊ शकतात, पण...
काही ठिकाणी आपण माफक स्वरुपात सवलत देत आहोत. काही जिल्हे हे शून्य रुग्ण आहेत. काही ठिकाणी नवे रुग्ण आहेत तिथे घट होत आहे. त्यामुळे आपण रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन केले आहे. ग्रीन झोनमध्ये आपण उद्योगांना सुरुवात करु शकतो. जर तुम्ही तुमच्या मजूरांची काळजी घेत असाल, तर आम्ही सर्व पुरवठा करु. आपण मालवाहतूक करु पण व्हायरस वाहतूक नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काहीही न करता शांत बसून राहणे यापेक्षा दुसरी शिक्षा नाही. आपल्याला हळूहळू शिथीलता आणायची आहे. लगेचच सर्व सुरु करणार नाही. शेती आणि कृषीमध्ये आधीही बंधने नव्हती आताही राहणार नाही. जिल्ह्याच्या सीमा अजून उघडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाबंदी अद्यापही कायम

तुम्ही जिल्ह्यातील जिल्ह्यात ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही. काही जणांच्या मनासारखे करतो. ते माझे कौतुक करतात. पण मी काही जणांच्या मनासारखं करत नाही ते मला बोलतात, मी माझ्या महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कारण मला राज्यावर आलेले संकट संपावयाचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लहान मुलांनी काळजी करू नये, आम्ही मोठी माणसं खंबीर आहोत
काही लहान मुलं त्यांच्या वाढदिवसाचे, सायकलचेपैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहे. मात्रतुम्ही काळजी करु नका, आम्ही मोठी माणसं खंबीर आहोत. सरकार खंबीर आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांना केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post