महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांनी गाठला 302 चा आकडा


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. गेल्या २४ तासांतच राज्यात तब्बल ८२ नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३०२ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचाही समावेश करण्यात आला आहे.


मुंबई शहर आणि परिसरात सोमवारी सापडलेल्या ३० रुग्णांसह मंगळवार संध्याकाळपर्यंत २९ रुग्णांची वाढ होऊन आकडा तब्बल ५९ वर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर गेली आहे. १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील, ५ रुग्ण पुण्याचे, तीन नगरचे आणि २ बुलडाण्यातील आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post