कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टरांसह 92 कर्मचारी क्वारेंटाइन


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयातील काही डॉक्टर्स आणि कर्मचारी, अशा 92 जणांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे. रुग्णालयातील कोरोनाग्रस्तरुग्णांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिल्लीतील निजामुद्दीन मरकजशी संबध नसल्याचेअधिकाऱ्यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजचे डीन जितेंद्र भावलकर यांनी सांगितले की, '31 मार्चला एका ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा अपघात झाला.त्या 30 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयाच्या आपातकालीन विभागात भरती करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला ताप आली. त्यानंतर डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी त्या व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवले असता, तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्या रुग्णाला तात्काळ यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर आम्ही त्याच्या संपर्कात आल्यामुळेआमच्या 42 डॉक्टर आणि 50 कर्मचाऱ्यांना क्वारेंटाइन केले. सध्या त्या सर्वांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post