कोरोना इफेक्ट / पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास 31 मार्चपर्यंत बंदी


माय अहमदनगर वेब टीम
नागपूर- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मध्य रेल्वेने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास बंदी घातली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना पाठवला आहे. प्रवासी रेल्वेगाड्यांतून पाळीव प्राण्यांना डाॅग बाॅक्समध्ये ठेवून नेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई केली आहे. कुत्रा तसेच मांजर आदी पाळीव प्राण्यांना लोक आता घरी सोडून जात नाहीत. कारण त्यांचा सांभाळ करणारे कोणी नसते. रेल्वेने न्यायचे असल्यास पाळीव प्राण्यांचे बुकिंग पार्सल कार्यालयात करावे लागते. त्यासाठी ठराविक शुल्क भरावे लागते.

कोरोना विषाणूचे संकट पाहाता रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सांगलीमार्गे उत्तर आणि दक्षिण भारतात जाणार्‍या गाड्यांचा समावेश आहे. दि. ३१ मार्चपर्यंत रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामध्ये मिरज-हुबळी मिल्क एक्सप्रेस कोल्हापूर-मनुगर, धारवाड-हबीबगंज या साप्ताहिकी एक्सप्रेस बरोबरच मिरज-सोलापूर, यशवंतपूर-पंढरपूर, या एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post