बापरे, भारतात आतापर्यंत 1 हजार 441 कोरोनाची लागण


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोना संक्रमाणाने 28 राज्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. झारखंडमध्ये पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. राज्याचे आरोग्य सचिव नितिन मदन कुलकर्णीने सांगितले की, मलेशियाच्या एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्याला रांचीच्या हिंदपीडी गावात बनवण्यात आलेल्या आयसोलेश सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

दुसरीकडे, देशात मंगळवारी कोरोना संक्रमणाचे 94 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात सर्वात जास्त 19 संक्रमित मध्यप्रदेशमध्ये आढळले आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेश 17, राजस्थान 14, महाराष्ट्र 10, तमिळनाडु-कर्नाटकात 7-7, जम्मू-काश्मीरमध्ये 6, उत्तरप्रदेशमध्ये 5, गुजरात 3, बंगाल 4 आणि बिहार-झारखंडमध्ये प्रत्येकी 1-1 रुग्ण आढळला आहे्. यासोबतच देशात एकूण संक्रमितांची संख्या 1 हजार 441 झाली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. यात चंदीगडमध्ये पहिला मृत्यू झाला आहे तर केरळमध्ये एका 68 वृद्धाचा जीव गेला. तसेच, मध्यप्रदेशमध्येही एका 49 वर्षीय महिलेने जीव गमावला आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत सध्या संक्रमितांची संख्या 1251 आहे. यातील 101 रुग्ण बरे झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post