शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- सामान्य रयतेच्या सुख:दुखाची काळजी घेणारे, सर्वांना सारखा न्याय देणे हाच राजधर्म आहे. या राज्धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत
स्वत:च्या वंशाचे नव्हे तर आठरे पगड जातीधर्माचे आणि सामान्य रयतेचे राज्य स्थापन करणारा राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. महिलांचे संरक्षण, साधु-संतांचा आदर आणि देवदेवतांचा भक्तीभाव या निष्ठापूर्वक संकल्पनने महाराजांनी सुशासन विश्व निर्माण करुन स्वराज्याची स्थापना केली. रयतेची जाण असल्यानेच ४00 वर्षांच्या कालखंडानंतर देखील केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर केवळ भारतवर्षात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जात आहे व घेतले जाणारही आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४00 वर्षापूर्वीच्या इतिहासाची ओळख आजच्या युवकांना होणे गरजेचे आहे. यासाठी शहरामध्ये तिथी नुसार विविध मंडळाने सामाजिक उपक्रमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली, असे प्रतिपादन आमदार अरुणकाका जगताप यांनी केले. सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली आहे. कायनेटीक चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना आ. अरुणकाका जगताप, मा.नगरसेवक दीपक खैरे, युवराज खैरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माऊली जाधव, दिनेश सपाटे, भैय्या कांबळे, निलेश बांगरे, बाली बांगरे, प्रशांत हारुणकर, दत्ता दहिंडे, अशोक शेळके, प्रशांत धलपे, सागर साबळे, निलेश डफळ, गणेश शेलार, मनोज नन्नवरे, बलराज खैरे, दीपक लोंढे, संजू कांबळे, शरद दळवी, अन्सार शेख, गणेश तोडमल, क्रषी शिंदे, निखिल पानसंबळ, आदित्य कांबळे, मनोज गायकवाड
उपस्थित होते. यावेळी कायनेटीक चौकाचे फुलांनी सजावट केली होती.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखाव्याचे आयोजन
माळीवाडा शिवसेना व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यातीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा सादर केला. या
देखाव्याचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महारपौर सुरेखा कदम, भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, ज्येष्ठ नेते श्रीराम एंडे,
नगरसेवक अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, अनिल बोरुडे, आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, शिवाजी कदम, दत्ता कावरे, बाळासाहेब ठुबे आदी उपस्थित होते.



शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना नगरसेविका शितल जगताप, महिलाध्यक्षा रेशमा आठरे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, अंजली आव्हाड, बाबासाहेब गाडळकर, संतोष ढाकणे, सारंग पंधाडे, अमोल कांडेकर, भरत गारुडकर आदी यावेळी उपस्थित होते.

शहर शिवसेनेच्यावीतने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना शहर शिवसेनेच्यावतीने इंपिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना शवसेनेचे
संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महारपौर सुरेखा कदम, ज्येष्ठ नेते श्रीराम एंडे, नगरसेवक अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, अनिल बोरुडे, आप्पा नळकांडे, सचिन शिंदे, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, शिवाजी कदम, बाळासाहेब ठुबे आदी उपस्थित होते.

चाणक्य प्रतिष्ठानच्यावतीने जयंतीनिमित्त पुतळ्यावर पुष्पवृष्टी
बुरुडगाव रोडवरील चाणक्या चौकातील मोरया प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करताना नगरसेविका शितलताई जगताप. समवेत शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रेशमा आठरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल कावळे व मित्रपरिवार यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.


केमिस्ट असोसिएशनच्यावतीने पोलिस दलात मास्क वाटप
नगर तालुका व शहर केमिस्ट असोसिएशचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कोतवाली पोलिस स्टेशनमधील अधिकारी व
कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. कारण शहरामध्ये विविध मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे. सध्या भारत देशामध्ये करोना या आजाराची भीतीचे सावट आहे. पोलिस खात्यातील कर्मचारी आपल्या संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. गरजेच्या ठिकाणी त्यांना जावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य समजून त्यांना केमिस्ट असोसिएशनच्यावतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दत्ता गाडळकर, भरत सुपेकर, भुपेंद्र खेडकर, देविदास काळे, कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विकास वाघ, पी.एस.आय. बाळासाहेब खामकर, सचिन गोरे, मनोज गुंजाळ आदी उपस्थित होते.


माऊली मित्रमंडळाच्यावतीने विविध स्पर्धा व पर्यावरण समतोल संदेश नियोजन
केडगाव भूषणनगर येथे माऊली मित्रमंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे सामाजिक उपक्रमाने शिवजयंती साजरी केली जाते. यावेळी पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आ. संग्राम जगताप, नगरसेवक मनोज कोतकर, संभाजी पवार, माऊली जाधव, जगन्नाथ निंबाळकर, झगडे गुरुजी, धनंजय जामगावकर, जालिंदर कोतकर, राजेश भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्षारोपण व त्याचे संवर्धन यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय माऊली मित्रमंडळाने घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post