२२ फेब्रुवारीला बाजार समितीस दादा पाटील शेळके यांच्या नावाचा नामकरण सोहळा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : माजी खासदार, ज्येष्ठ नेते स्व. दादापाटील शेळके यांचे नाव नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीला
देण्याचा नामकरण सोहळा व नगर तालुक्‍्यातले भूमिपुत्र पोपटराव पवार यांना पद्यश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार दि. २२ फेब्रुवारी रोजी सहकारी सभागृह येथे दु. १२ वा. आ. अरुणकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व शिवाजीराव कर्डिले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यासाठी तालुक्‍यातील कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलताना अशी माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रावसाहेब पाटील शेळके, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, संभाजी पवार, रेवन चोभे, दिलीप भालसग आदींसह तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.

माजी मंत्री कर्डिले पुढे म्हणाले की, स्व. दादापाटील शेळके व माझ्यात राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला. परंतु
आम्ही कधीही विकास कामामध्ये कधीही आडकाठी आणली नाही. दादा पाटील शेळके यांनी तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा विचार करुन गंज बाजार येथे बाजार समितीची स्थापना केली. शहराच्या विस्तारीकरणाचा विचार करुन दादा पाटील यांनी बाजार समितीचे स्थलांतर मार्केटयार्ड येथे केले. आज बाजार समितीचे एक वटवृक्ष निर्माण झाले आहे. बाजार समितीचा मुहूर्तमेढ दादा पाटील रोवला असल्यामुळे आज बाजार समितीला त्यांचे नाव देण्याचा ठराव केला आहे. तसेच आपल्या तालुक्‍याचे भूमिपुत्र पोपटराव पवार यांनी सरपंच पदाला देशपातळीवर घेऊन जाण्याचे काम केले. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण, पाणी, वृक्ष संवर्धन यावर काम करुन आपल्या तालुक्‍याचे नाव देशपातळीवर नेले. आपल्या माणसाचा सन्मान व्हावा, यासाठी पोपटराव पवार यांचा सर्वांच्या वतीने नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नगर तालुक्‍यातील जनतेने
मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन माजी मंत्री कर्डिले यांनी केले आहे.

रावसाहेब पाटील शेळके यावेळी बोलताना म्हणाले की, माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या बाजार समितीला त्यांचे नाव देण्याचा मोठेपणा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दाखविला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दादा पाटलांनी
तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी विविध संस्था उभ्या केल्या आहेत. त्या संस्थांना पुढे नेण्याचे काम माजी मंत्री कर्डिले यांनी केले आहे. तसेच पोपटराव पवार यांना पद्यश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती विलास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप भालसिंग यांनी केले. तर आभार
हरिभाऊ कर्डिले यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post