माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : भाजीपाला, खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता वीज दरवाढीचा फटकाही बसणार असून महावितरण कंपनी सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांवर सुमारे ६ टक्के वीज दरवाढ लादण्याच्या तयारीत आहे. सन २०२० ते २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने ५.८० टक्के वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
डिसेंबर महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्क्यांवर गेला. यात भाजीपाल्याच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्के वाढल्या असून खाद्यपदार्थांच्या किमतीत १४.२२ टक्के वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ एप्रिल २०२० पासूनच्या या वीज दरवाढीमुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडणार आहे. पाच वर्षांच्या काळात वीज ग्राहकांकडून ६० हजार ३१३ कोटी रुपये वसूल करण्याचा महावितरणचा मानस आहे.
व्यापाऱ्यांनाही बसणार धक्का
व्यापाऱ्यांसाठीही दरवाढीचा प्रस्ताव अाहे. २०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी सध्याचा ६.१० पैसे दर पाच वर्षांत ८.७० रुपयांपर्यंत जाणार आहे, तर २०० युनिटपेक्षा जास्त वीज वापर करणाऱ्यांसाठी सध्या ९.२५ रुपये दर असून तो कमी करून ७.९० रुपये करण्यात आला आहे. तो पाचव्या वर्षी हा दर ८.७० रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. २० केव्ही ते ५० केव्हीपर्यंत वीजकर्त्यांचा ९.३० रुपये असलेला दर ९.५० रुपये ते १०.७० रुपयांपर्यंत वाढेल.
घरगुती ग्राहकांना असा बसेल फटका
युनिट : सध्याचे दर : प्रस्तावित वाढ
१०० : ३.०५ रु. : ३.३० ते ४.१० रु.
१०१ ते ३०० : ६.९५ रु. : ७.३० ते ८.१० रु.
३०१ ते ५०० : ९.९० रु. : ५ वर्षे कायम
५०० युनिट + : ११.५० रु. : २० पैसे वाढ
बीपीएलधारकांसाठी सध्या १.१० रुपये दर असून तो २०२५ पर्यंत ६० पैशांनी वाढून १.७० रुपयांपर्यंत नेण्याचा महावितरणचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित वाढ अशी
वीज महसूल ८९ हजार कोटींवरून १ लाख ८ हजार कोटींवर जाणार
प्रस्तावित वीज दरवाढीमुळे २०-२१ मध्ये ८२,९२५ कोटी (७६,९९८ सध्याच्या वीज दरानुसार मिळणारा महसूल), २१-२२ मध्ये ८८,८८७ कोटी (७९,९२७ सध्याचा महसूल), २२-२३ मध्ये ९५,०५१ कोटी (८३,०१८ सध्याचा महसूल), २३-२४ मध्ये १,०१,३९० कोटी (८६,३१० सध्याचा महसूल) आणि २४-२५ मध्ये १,०८,१६० कोटी (८९,८०१ सध्याचा महसूल) रुपयांचा महसूल मिळेल, अशी अपेक्षाही या प्रस्तावात व्यक्त केली आहे.
Post a Comment