वडिलांच्या श्राद्धानिमित्त जि.प.शाळेस स्वागत कमान भेट
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - आपल्या वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त घोसपुरी (ता.नगर) येथील झरेकर बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोसपुरी या शाळेस स्वागत कमान भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली व समाजासमोर एक आदर्श ठेवला.
घोसपुरी येथील कै.बाळासाहेब रामदास झरेकर हे महाराष्ट्र परिवहन महामंडळात सेवेत असताना वर्षभरापूर्वी त्यांचे दुःखद निधन झाले. तदनंतर वर्षभराने प्रथम वर्षश्राद्ध निमित्त सामाजिक भावनेतून त्यांचे तीनही मुलांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षश्राद्ध दिनी आपल्या गावातील ज्या शाळेत आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्या गावासाठी त्या शाळेसाठी कमान देऊन एक छोटीशी मदत देऊ केली व आपल्या वडिलांच्या स्मृति नितांत जागृत ठेवण्याचा त्या माध्यमातून एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम सर्वांसमोर ठेवला. या झरेकर बंधू पैकी योगेश झरेकर हे भारतीय सैन्यदलात, निलेश झरेकर मायक्रोबायोलॉजीस्ट तर संदेश झरेकर हे प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिक जिल्हा परिषदेच्या येवला येथील शाळेत कार्यरत आहेत.
त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार निलेश लंके, माजी सभापती अशोकराव झरेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धर्माधिकारी, शिक्षक अरुण काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब झरेकर व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.
Post a Comment