प्रदूषण मुक्तीसाठी नगरमध्ये जनजागृती मोहीम
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरी भागामध्ये मोठया प्रमाणात नागरिक मोठया संख्येने वास्तव्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या समोर प्रदूषणाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रदूषणामुळे अनेक महानगरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रदूषण मुक्त शहर राहण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रदूषणामुळे नगारिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागते. यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे. असे आवाहन बाईक केअर झोनचे रोहन सांभार यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाईक केअर झोन दिल्लीगेट व इसार पेट्रोल पंप, फुलारी मळा यांचे संयुक्त विदयमाने ध्वजवाटप व दुचाकीची मोफत तपासणी व प्रदूषण मुक्ती करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी रोहन सांभार ,कैलास फुलारी, विशाल फुलारी, समिर कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते.
बाईक केअर झोन हे दुकाची वाहन क्षेत्रातील एक अग्रगण्य वर्कशॉप आहे. यामाध्यमातून समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो त्यामुळे विविध सामाजिक उपक्रम यशस्वी होतात. बाईक केअर झोन ग्राहकांना विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देत आहेत.
Post a Comment