राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनाम्याबद्दल खुलासा ; म्हणाले 'त्या' फक्त वावड्याच


माय अहमदनगर वेब टीम
औरंगाबाद - शिवसेनेचे सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे वृत्त समोर आले होते. दरम्यान माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांसोबत बोलल्यानंतर इतर सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ज्यांनी राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या त्यांना याबाबत विचारा असे सत्तार म्हणाले.

सकाळपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यानंतर अब्दुल सत्तार तब्बल नऊ तासांनंतर माध्यमासमोर आले. मी वेळ आल्यावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. मी आज मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर तुम्हाला याबद्दल सांगणार असल्याचे सत्तार म्हणाले.


शिवसेनेचे सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे वृत्त समोर आले होते. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाही असा दावा आमदार अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केला होता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post