नराधमांचा खात्मा करताच हैदराबाद पोलिसांचे जंगी स्वागत, देशभरातून कौतुक


माय अहमदनगर वेेेब टीम
हैदराबाद - हैदराबाद निर्भया प्रकरणात बलात्काऱ्यांचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिस टीमचे स्थानिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. पीडित महिला डॉक्टरच्या शेजाऱ्यांना हैदराबाद पोलिसांना राखी बांधून आपला आनंद व्यक्त केला. तर एका ठिकाणी महिलांनी पोलिसांना पेढे भरवले. एन्काउंटर ठिकाणावरून परत येणाऱ्या पोलिसांच्या स्वागतासाठी स्थानिकांनी गर्दी केली. तसेच नाचत गात त्यांना खांद्यावर उचलून आणले. दरम्यान, काहींनी आपल्या घरांच्या छतांवरून फुले आणि फुलांच्या पाकळ्या बरसावून पोलिसांचे स्वागत केले.

पीडितेचे वडील म्हणाले- आमच्या मुलीला न्याय मिळाला
नराधमांच्या एन्काउंटरचे वृत्त समोर येताच पीडितेच्या वडिलांनी पोलिस कारवाईचे समर्थन केले. "आमच्या लेकीचा मृत्यू होऊन 10 दिवस उलटले आहेत. तेलंगणा सरकार पोलिस आणि आमच्यासोबत ठामपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे अभिनंदन. पोलिसांनी खरंच खूप चांगली कामगिरी केली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. ते पळून गेले असते, तर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जणार आणि त्यांना पकडणे देखील एक आव्हान ठरले असते. पुन्हा पकडले गेल्यानंतरही त्यांना वेळेवर योग्य शिक्षा मिळाली असती का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच, पीडितेच्या बहिणीने सुद्धा पोलिस कारवाईचे स्वागत केले. हैदराबादसह देशभर या एन्काउंटरनंतर हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post