या 4 गोष्टींकडे लक्ष दिल्यास राहाल फिट
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - दैनंदिन जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याची आपण काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते.
1. भाज्या किंवा फळे कापल्यानंतर चाकू न धुता वापरला तर अन्न विषारी होते. त्यामुळे भाज्या किंवा फळे कापल्यानंतर चाकू धुऊन ठेवा किंवा दुसऱ्यांदा वापरण्याआधी धुऊन घ्या. अशा वस्तू जीवाणूंच्या संपर्कात लवकर येतात. त्यामुळे याची काळजी घ्या.
2. घरातील अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरापेक्षा अधिक धोकादायक असतो. त्यामध्ये असलेल्या रसायनांमुळे चिडचिड होते. याव्यतिरिक्त यामुळे कर्करोग आणि मेंदूच्या ट्यूमरचा धोकादेखील वाढतो.
3. गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही साखरेच्या पदार्थाची निवड करता का? साखरेऐवजी तुम्ही ब्राऊन राइस सिरप, फ्रुक्टोज, उसाच्या रसाचा वापर करू शकता. मध, नारळ, डेट शुगर, मेपल सिरप, शुगर, फ्रूट कंसन्ट्रेट्समध्ये मिनरल्स व व्हिटॅमिन जास्त असतात.
4. ऑफिसमध्ये किंवा घरी संगणकावर काम करत असताना अनेकदा डोळे दुखतात.त्यामुळे दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यावर लावा. याने डोळ्याला आराम मिळतो. असे दोन-तीन वेळा करा. यामुळे डोळ्यांना ऊर्जा मिळते.
Post a Comment