नाराज असल्याच्या बातम्या चुकीच्या



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली.जळगावातील सिंचन प्रकल्पांसंदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेचमी नाराज असल्याचा बातम्या चुकीच्या असल्याचेही ते म्हणाले.

 उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यात 25 मिनिटे चर्चा झाली.
खडसे म्हणाले की, "माझ्या मतदारसंघातील शेळगाव आणि बोदवड उपसा सिंचन योजनेला केंद्राने मंजूरी दिली आहे. त्यासाठी मला शिफारसीची ताबडतोब गरज होती. त्यासाठीच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडेही मी शरद पवारांप्रमाणेच शिफारशीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मदतीचेआश्वासन दिलेआहे, असेही खडसेंनी नमूद केले."
खडसे पुढे बोलताना म्हणाले, “12 डिसेंबर रोजीगोपीनाथ गडावर स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षी आम्ही या गडावर असतो. आताही आम्ही उपस्थित राहणार आहोत.मीमंत्रीअसताना5वर्षापूर्वीऔरंगाबादलागोपीनाथमुंडेयांचेस्मारकउभेकरावेयासाठी जागा उपलब्ध करुन दिली. मात्र, अद्यापही ते काम झालेलं नाही. उद्धव ठाकरेंना मी हे स्मारक करण्याची विनंती केली आहे.”
मी नाराज असल्याचा बातम्या चुकीच्या
एकनाथ खडसेंसह भाजपचे इतर नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. आपले सरकार का आले नाही याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान यावेळी राजकीय चर्चांवर त्यांनी बोलणे टाळल

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post