दहशतवादाला थारा देणाऱ्या राष्ट्राला सडेतोड उत्तर देणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन




माय अहमदनगर वेब टीम
पुणे - भारताने नेहमी इतर राष्ट्रांसोबत शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. कोणत्याही देशावर आक्रमण करण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र, जर कोणी आमच्यावर आक्रमण करेल तर त्याला सडेतोड उत्तर देऊ हा आमचा संकल्प आहे. सीमेच्या सुरक्षेसाठी व सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अाम्ही सदैव सज्ज आहोत. मात्र, जेव्हा कुठला देश त्याच्या भूमीवर दहशतवादाला आसरा देत असेल आणि त्याचा वापर भारतावर आक्रमण करण्यासाठी करत असेल तर अशा राष्ट्राला आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी व्यक्त केले.

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या १३७ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बाेलत हाेते. राजनाथसिंह म्हणाले, दहशतवादाचा अाम्ही याेग्य प्रकारे सामना करू. देशाच्या सुरक्षिततेसाठी केवळ सीमेवर सैनिक सज्ज राहणार नाहीतर त्यापुढे जाऊन ही कारवाई करण्याची क्षमता बाळगून अाहे. याचा अनुभव गेल्या साडेपाच वर्षांत आपण घेतला आहे. २०१६ मध्ये भारताने बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पाहिले अाहे. दहशतवादाचा धोका कशा प्रकारे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कारण, आपण आपल्या डोळ्यासमोर अमेरिकेतील ९/११ आणि भारतातील २६/११ च्या दहशतवादी घटना पाहिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post